Skip to content

Copyright Janhitmarathinews.in 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

Janhitmarathinews.in
You are here :
  • Home
  • जिल्हा
  • आंतरराष्ट्रीय योग खेळाडू श्रीमती  डॉ. राधा सचिन तांबे यांना आदर्श योग प्रशिक्षक पुरस्कार जाहीर
जिल्हा Article

आंतरराष्ट्रीय योग खेळाडू श्रीमती  डॉ. राधा सचिन तांबे यांना आदर्श योग प्रशिक्षक पुरस्कार जाहीर

On September 7, 2025 by janhitmarathinews@gmail.com

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने  आंतरराष्ट्रीय योग खेळाडू श्रीमती  डॉ. राधा सचिन तांबे यांना आदर्श योग प्रशिक्षक पुरस्कार जाहीर
श्रीमती डॉ. राधा सचिन तांबे गेल्या सहा वर्षांपासून योग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी समाजासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी योग शिबिरांचे आयोजन करून अनेक महिला तसेच वृद्धांना आजारमुक्त, निरोगी व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये नेपाळ, थायलंड आणि व्हिएतनाम येथे सुवर्णपदके मिळवून देशाचा आणि राज्याचा मान उंचावला आहे.एम ए योगशास्त्र पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे तसेच नॅचरोपॅथी अँड डायटीशियन चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. त्या ‘राधिका अॅडव्हान्स योगा सेंटर, बीड’च्या संचालिका असून सध्या त्या चराठा प्राथमिक आरोग्य केंद्रात योग प्रशिक्षण देत आहेत. उत्कृष्ट योग शिबिरांच्या माध्यमातून त्या रुग्णांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करत आहेत.
या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना ‘आदर्श योग प्रशिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्या नंतर श्रीमती राधा तांबे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संतोष मानूरकर, तसेच संयोजन समिती बीडचे श्री. नितीन क्षीरसागर (उपसंपादक, दै. दिव्य लोकप्रभा) यांचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांनी म्हटले की, “शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करून समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य आपण करत आहात. योग क्षेत्रातील माझ्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.

You may also like

आश्रम शाळा अंथरवण पिंपरी तांडा येथे राष्ट्रीय खेळ दिवस साजरा

September 7, 2025
Tags: #sportsnews#todaysnews#beed#maharashtranews#viral#share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Archives

  • September 2025

Calendar

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
     

Categories

  • जिल्हा

Archives

  • September 2025

Categories

  • जिल्हा

Copyright Janhitmarathinews.in 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress